spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूका लागणार; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

राज्यात सत्तापालट झाली त्यानंतर आरोपप्रत्यारोपाच सत्र सुरू झालं. त्यानंतर सत्ताधारी विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. अशातच आज दोन युवराज एक गड असा संघर्ष आज पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे आज शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आज सभा घेणार आहेत तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरसंवाद साधत आहेत. या वेळी आदित्य ठाकरेंकडून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल केला आहे.

पश्चिम विदर्भात एकच निष्ठावान आमदार आहे. त्याला आज मी मिठी मारण्यासाठी आलो आहे, असं वक्तव्य करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना मंचावरच मिठी मारली. हे तेच आमदार आहेत, जे गुवाहटीला जाण्यासाठी शिंदे (CM Eknath Shinde) गटाबरोबर गेले. मात्र सूरतहूनच निघून आले. शिंदे गटाने गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख सांगतात. अकोल्यात आज आदित्य ठाकरे यांनी गद्दार विकले गेले, पण नितीन देशमुख विकले गेले नाहीत, असा आवर्जून उल्लेख केला. सभेत बोलताना नितीन देशमुख आणि अरविंद सावंत यांच्या हातात हात घेत, तो उंचावून दाखवत अभिवादन केलं. ज्यांनी स्वतःला विकलं नाही त्यांना मी भेटायला आलोय. असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. या सभेसाठी विरोधे पक्ष नेते अंबादास दानवे, नितीन देशमुख उपस्थित होते. “महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना २.५० लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. सुभास देसाई यांनी करोना काळात ६.५० लाख कोटींची गुंतवणूक आणली. मात्र, हे घटनाबाह्य सरकार आहे. गद्दारांच सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूका लागणार,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

जवळपास राज्यात सत्तांतर होऊन चार महीने झाले आहेत, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करत असून चाळीस आमदार यांच्यासह सरकारवर हल्ला बोल करत आहे. राज्यातील सरकार काही महिन्यांत कोसळणार असून लवकरच निवडणुका लागणार असल्याचे भाकीत आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेलं हे भाकीत करत असतांना उपस्थित कार्यकर्ते यांना तुम्ही तयार राहा अशी साद घालत वातावरण निर्मिती केली आहे.शेतकरी प्रश्नांवर आम्ही ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत आहोत, मात्र त्याला सरकार काहीच उत्तर देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा :

WhatsApp Update : व्हाट्सअँपने यूजर्सला दिली ‘हि ‘ खास भेट; घ्या जाणून

Thackeray Vs Shinde : सिल्लोडमध्ये ठाकरे-शिंदेच्या सभेची चर्चा, आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स पाहिले का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss