राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संताप व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने करायला लावणाऱ्यांमागे कोणाचा मेंदू आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची प्रतिक्रिया आली. मात्र त्यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यावर बोलणं टाळलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेच्या खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार मोडले, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन काम करत आहोत. आम्ही जे काम करतो ते उघड करतो. आम्हाला आत्मविश्वास होता म्हणून माझ्यासोबत ५० आमदार आणि १२ खासदार आल्याचं शिंदे यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार काम करत आहे. शिवाजी महाराजांच्या अपमानावरून शिंदे गटाने सरकारमधून बाहेर पडावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. मात्र वादग्रस्त टीका करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविषयी बोलणं शिंदे यांनी टाळलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

वृद्धाश्रमातही जागा नसलेल्या मंडळींना राज्यपाल म्हणून का पाठवता, या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खिल्ली उडवून उद्धव ठाकरे यांनी कोश्यारींना तातडीनं राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्या दोघांचाही समाचार घेतला. कोश्यारी यांनी महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तिमत्त्वांचा सातत्यानं अपमान केला आहे, याकडे त्यांनी राज्याचं लक्ष वेधलं. कोश्यारी यांनी शिवछत्रपतींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधासाठी त्यांनी भाजपसह सर्व पक्षातल्या महाराष्ट्रप्रेमींना एकत्र येण्याचं आवाहन केलं. तसंच या मुद्द्यावर शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपच्या महाराष्ट्रातल्या कथित धोरणांचा आपल्या शैलीत समाचार घेतला.

हे ही वाचा:

तुपकरांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या जलसमाधी आंदोलनला तूर्तास स्थगित

कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत; देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version