मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे… बच्चू कडू यांची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्यात मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यानंतर तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्री मंडळ हे स्थापन झाले.

मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे… बच्चू कडू यांची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्यात मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यानंतर तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्री मंडळ हे स्थापन झाले. पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदारांना मंत्रिपद हे न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी दिसून येत आहे. मात्र, या सर्व आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपक्ष आमदार बच्चू कडू ( Bachu Kadu ) यांनी दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबात मोठी अपडेट दिली आहे.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांना अपेक्षा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, मंत्रीपदासाठी माझी नाराजी नाही. असे स्पष्ट करत १५ सप्टेंबर पर्यंत दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

बच्चू कडू आज पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, माझा देखील फोन टॅप झाला होता. मी गांजा तस्करी करतो म्हणून फोन टॅप करण्यात आला होता. याबाबत आरोप झाले परंतु मला कोणाच्या क्लीन चीटची गरज नाही. मी देखील शरण जाणार नाही. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी काही केलं नसेल तर शरण जाण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले, कामानिमित्त बाहेर असल्याने मी काल येऊ शकलो नव्हतो. नाराज आहे म्हणून न येण्याचं काही कारण नाही. नाराजी असली तरी ती सभागृहात दाखवण्यात अर्थ नाही. मी याआधीही बोललो आहे की, व्यक्तिगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे असून त्यासंबंधी लढा सुरु राहील, असं ते म्हणाले. १५ सप्टेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. त्यावेळी मी शपथ घेईन. अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसंबंधी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ईडीचा उपयोग देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी केला आणि तो सार्वत्रिक केला तर चांगलं होईल.

 

हे ही वाचा :-

श्रीलंकेने अदानी समूहाच्या दोन पवन ऊर्जा प्रकल्पांना तात्पुरती दिली मान्यता

कोविड प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करा, DGCA चे विमान कंपन्यांना आदेश

 

Exit mobile version