spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत; देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. आमचा भाग आम्हाला मिळणारच आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबरोबरोबरच पक्षाचा वाद कोणीही सीमा प्रश्नात आणू नये, असे आवाहन देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी आपले मत मांडले. उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधानांना याबाबतचे पत्र पाठले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची भूमिका मांडली आहे. परंतु, या प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यांच्यावरून कोणत्याही प्रकारचा वाद होऊ शकत नाही. याबरोबरच या विष्यावरून राजकारण देखील करता येणार नाही, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही आणि आमचा भीमा भाग आम्हाला परत मिळेल. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही न्यायालयात माडंली आहे. कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. परंतु,यात कोणीही राजकारण आणू नये. या पूर्वी सर्वात जास्त काळ कर्नाटक आणि महाराष्ट्रात देखील काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार होतं. परंतु, त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सीमा प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये. प्रत्येकाने याबाबत बोलताना विचार करून बोललं पाहिजे. आपर्यंत पक्षाचा वाद सीमा वादात आणला नाही. सीमा भागासाठीचा आपला लढा सुरूच राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

Indian Science Congress : नागपुरात ४९ वर्षांनंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन

शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे दिली महाराष्ट्र बंदची हाक म्हणाले, वेळ आली तर महाराष्ट्र…

महाराष्ट्रातील प्रकल्पांनंतर राज्यातील गावंही दुसऱ्या राज्याच्या घशात घालणार का? ; नाना पटोले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss