राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, स्वतःच पद उपमुख्यमंत्र्यांना केलं बहाल

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. राज्यात जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री बनतील असा अंदाज बांधला जात होता.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, स्वतःच पद उपमुख्यमंत्र्यांना केलं बहाल

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. राज्यात जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री बनतील असा अंदाज बांधला जात होता. पण त्याउलट घडलं आणि सारेच अवाक झाले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी, समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी फडणवीसांनी स्वतः कार चालवली व शिंदे शेजारी बसले होते. तेव्हादेखील, राज्याच्या सरकारचं स्टेअरिंग (निर्णय घेण्याची क्षमता) फडणवीसांकडेच आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला. त्यांच्या तोंडून जरी ही गोष्ट चुकून निघाली असली, तरी त्यावरून आता राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत हेच कदाचित एकनाथ शिंदे विसरले. मुंबईच्या गोरेगाव येथील कोकण महोत्सवा दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना ‘राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी…’ असे म्हटले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण महोत्सवाला शुभेच्छा देत चांगलं आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केलं. कोकण महोत्सव गेल्या ८ वर्षांपासून आयोजित केला जात आहे. मी या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिलो आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीनं निसर्ग समृद्ध कोकणाला आर्थिक समृद्ध करण्यासाठी काम केलं जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचं काम केलं जात आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कोकणाचं एक स्वत:चं वेगळं वैशिष्ठ्य आहे. जंगल, समुद्र किनारे आणि किल्ले कोकणाला लाभलेले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोकणातील माणूस आंब्यासारखा गोड असतो. कोकणातील माणूस गोड आहे सर्वांवर प्रेम करणारा आहे. मनाशी काही ठरवलं तर आरपारची लढाई लढणारा देखील कोकणातील माणूस आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

येवा कोकण आपलाच असा, या वाक्यातून प्रेमळ हाक कोकणी बांधव सर्वांना घालत असतो. पोफळीच्या बागा, आंब्याचा बागा यातून कोकणाच्या सौंदर्यात भर घातली आहे. समुद्र किनाऱ्यांच्या माध्यमातून पर्यटनाला वाव आहे. आपलं सरकार हे कोकणाच्या विकासासाठी संवेदनशील आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कोकणाच्या विकासासाठी काही प्रकल्प सुरु करण्यात आले. ते काही कारणांमुळं पुढे सरकले नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटक बँकच्या फलकाला फासलं काळं

कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे?, बाळासाहेब थोरात

Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत ‘आप’ला बहुमत, १५ वर्षांपासूनची भाजपची सत्ता येणार का संपुष्टात ?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version