spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर म्हणाले मुख्यमंत्री

विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली.

विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर असल्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला राष्ट्रवादी फोडण्यामध्ये यश आले आहे. तरी आता शिंदे गटाचे काय स्थान असणार याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

शिवसेनेमधून बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष करुन उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. निधी वाटपामध्ये त्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याचबरोबर सातत्याने राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला होता. परंतु, आता अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटाची आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण तर होणार नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे. आज मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यामध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

संभाव्य खाते वाटप

अजित पवार : जलसंपदा
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील : ऊर्जा
हसन मुश्रीफ : कौशल्य विकास
धनंजय मुंडे : गृहनिर्माण
आदिती तटकरे : महिला व बालकल्याण
संजय बनसोडे : पर्यटन
अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

हे ही वाचा:

बुलढाण्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नागपूरहून जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात

आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss