Nagpur Car Accident: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला (BJP) लक्ष केले आहे. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी यावरून आधीच भाष्य करत चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नागपूर पोलिसांनी यावर पत्रकार परिषद घेत अपघातातील गाडी जरी संकेत बावनकुळे यायची असली तरी अपघाताच्या वेळी ते गाडी चालवत नसल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये सत्तेचा माज म्हणून मुलाला राहिला नाही कायद्याचा धाक, असा टोला लगावण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या भरधाव ऑडी कारने एकामागोमाग पाच वाहनांना उडवले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवल्या आहेत. तेंव्हा आता मिंधे- भाजप सरकार ह्याला कायदा समान लावेल का? असा सवाल विचारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
“अपघातात वापरलेली गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. कारमध्ये तीन लोकं होते, अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे हे गाडीत होते. तिघांचीही चौकशी केली आहे, त्यात गाडी चालवणारा अर्जुन हावरे याला अटक केली होती. पण नंतर त्याला बेल मिळाली. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता. अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे, अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते. गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा नंबर प्लेट होती,” अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना दिली.
हे ही वाचा:
BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा