spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजप नेत्यांची महाराष्ट्राचे नुकसान होताना मोदी सरकारसमोर ब्र काढण्याची हिंमत; सचिन सावंत

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टाटा एअरबस हा प्रकल्प गेल्यावर्षींच गुजरातमध्ये गेल्याचा दावा केला होता. उदय सामंत यांनी महाविकास आघाडीच्या काळात यासंदर्भात काही प्रयत्न करण्यात आले नाहीत असा आरोप केला होता. उदय सामंत यांनी एअरबसचा सामंजस्य करार गेल्या वर्षीच झाल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उदय सामंत यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. एअरबसचा आणि भारत सरकारचा सामंजस्य करार झाला होता, तो गुजरात बरोबर नव्हता झाला, असं सचिन सावंत म्हणाले.

भाजप नेत्यांची महाराष्ट्राचे नुकसान होताना मोदी सरकारसमोर ब्र काढण्याची हिंमत होत नाही. उद्योगमंत्री म्हणतात की एक वर्षांपूर्वी MOU झाला होता. परंतु तो केंद्र सरकार व एअरबसमध्ये झाला होता. गुजरात बरोबर नाही. दुसऱ्या राज्यात जाणारे प्रकल्प थोपवण्याची ताकद आता कुठे गेली?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला. टाटा एअरबसला केंद्र सरकारने गुजरातमधील ढोलेरा जागा दाखवली पण आता तो बडोद्याला होत आहे. यातून ढोलेरा अव्यवहार्य ठिकाण आहे हे माझे म्हणणे खरे ठरते. गुजरातमध्येच सर्व प्रकल्प जावेत ही मोदी सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्राचे जाणिवपूर्वक नुकसान केले जात आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

देशात तीन सरकार गुजरातच्या हितासाठी कार्यरत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे फडणवीस सरकार! गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेगाने गुजरातकडे महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प चालले ते पाहता जितका काळ हे राहतील तितका महाराष्ट्र कंगाल होईल, असं सचिन सावंत म्हणाले. टाटा एअरबसचा लष्करी विमान निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं राज्यातील शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारकडून उदय सामंत यांनी आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद देखील घेतली होती.

 

हे ही वाचा :

रवी राणांवरील टीका महागात, बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात युवा काँग्रेस आक्रमक; ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss