spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा…’ – अनिल देसाई

शिवसेनामध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आला आहे. निवडणूक आयोगाने काल शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार अॅड. अनिल देसाई यांनी दिली. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सुनावणी अपेक्षित होती. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच निवडणूक चिन्ह गोठवले असल्याचे देसाई यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठक बोलावली असून त्यात महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला अपेक्षित असलेले चिन्हं निवडणूक आयोग देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना नेते खासदार अॅड. अनिल देसाई यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे. निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडली. त्याअनुषंगाने काही कागदपत्रेदेखील सादर केली. निवडणूक आयोग आम्ही सादर केलेली कागदपत्रे तपासतील आणि त्यानंतर सोमवारी सुनावणी घेतील, त्यानंतर निर्णय देतील अशी अपेक्षा होती. मात्र, सुनावणी न करताच निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडून निष्पक्ष काम करणे अपेक्षित आहे. संविधानाने मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर टाकली आहे. मात्र, त्याला दूर सारून निवडणूक आयोगाने निर्णय दिला असल्याचे त्यांनी सांगितले. ते दिल्ली मध्ये माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनीतिबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत शिवसेनेच्या संभाव्य निवडणूक चिन्हाबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या, उगवता सूर्य, ढाल तलवार, मशाल आदी चिन्हांची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. त्यावर बोलताना देसाई यांनी म्हटले की, माध्यमांवर काय चर्चा सुरू आहेत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही असं शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

‘वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं…’, एकनाथ खडसे

Sayani Gupta Birthday: ‘ही’ आहेत बॉलीवूडविश्वात नाव कमावणाऱ्या सयानी गुप्ताने आतापर्यंत साकारलेली ५ उत्कृष्ट पात्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss