दिल्ली हायकोर्टाने मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची दुसऱ्यांदा याचिका फेटाळली

दिल्ली हायकोर्टाने मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची दुसऱ्यांदा याचिका फेटाळली

दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. समता पार्टीने दोन जजेसच्या बेंचकडे ही रिट याचिका केली होती. ठाकरे गटाला मशाल चिन्हं न देण्याची विनंती समता पार्टीने केली होती. तर याआधी सिंगल जज बेंचने ही याचिका फेटाळल्यावर समता पार्टीन डबल जज बेंचकडे याचिका केली होती. आता डबल जज बेंचनेही याचिका फेटाळल्यामुळे मशाल चिन्हं ठाकरे गटाचंच यावर शिक्कामोर्तब झालंय. समता पार्टीने आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय.

हेही वाचा : 

Kartiki Ekadashi : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे, मात्र परतीच्या पावसामुळे भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले होते. तसेच खरी शिवसेना कुणाची यावरून सुप्रिम कोर्टात लढाई सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच उद्धव ठाकरेंचा गट आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला तात्पुरते नवे चिन्ह आणि नाव दिले होते. त्यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाले होते. मात्र हे मशाल चिन्ह आपले असल्याचा दावा करत समता पार्टीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार?

वाद काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘धगधगती मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीनेही दावा केला होता. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. इतकेच नव्हे तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली होती. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता.

मला वाद वाढवायचा नाही, त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही : बच्चू कडू

Exit mobile version