Maharashtra Politics : ‘मी दिलेले शब्द मागे घेतो…’ ; शिंदेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला

Maharashtra Politics : ‘मी दिलेले शब्द मागे घेतो…’ ; शिंदेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू व भाजपशी जवळीक असलेले आमदार रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत आहेत. रवी राणा आणि बच्चू कडू यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर रविवारी रात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर राजकीय खलबतं सुरु होती. जवळपास अडीच तास वर्षा बंगल्यावर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर बच्चू कडू आणि रवी राणा आपापल्या तलवारी म्यान करतील, असे सांगितले जात आहे. या दोन्ही नेत्यांकडून आज पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर या वादाला विराम दिला. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. हे वक्तव्य रवी राणा मागे घेत राणा यांची माफी मागितली.

हेही वाचा : 

KRK On Salman Khan : केआरकेने मागितली सलमानची माफी; “माझ्या अटकेत भाईजानचा हात…

रवी राणा यांनी बच्चू कडू यांची माफी मागत मी दिलेले शब्द मागे घेतो म्हणत हा वाद संपवला आहे. पुढं बोलताना ते म्हणाले की, मी माझे शब्द मागे घेतो, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून कोणी दुखवल असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमदार बच्चू कडू देखील त्यांचे शब्द मागे घेतील आणि मीही माझे शब्द मागे घेतो.

आमदार रवी राणा यांनी म्हटले की, शिंदे-फडणवीस हे माझे मार्गदर्शक नेते आहे. वर्षा बंगल्यावर अडीच तास मिटिंग झाली. आमदार बच्चू कडू यांच्या बरोबर वाद होते, काही मतभेद होते ते मिटले. त्यांनीदेखील काही अपशब्द वापरले आहेत. हे शब्द ते देखील मागे घेतील. आम्ही दोघेही सरकार सोबत आहोत. सरकारबरोबर आम्ही काम करू. माझ्याकडून वादावर पडदा पडला असल्याचेही राणा यांनी सांगितले.

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, उद्यापासून पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांनी वाढ

बच्चू कडू मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या भेटीआधी काय म्हणाले?

“आता आम्ही चर्चेला बसणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. चर्चा काय होते, समाधान काय होतं, त्यावर पुढचं ठरवलं जाईल. आमच्यावर झालेले आरोप फार गलिच्छ आणि खालच्या स्तराचे आहेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आपण पुढचा निर्णय जाहीर करु”, असं बच्चू कडू यांनी बैठकीला पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

Maharashtra Politics : ‘वर्षा’ वर तब्बल अडीच तास बैठक; बच्चू कडू-रवी राणा वाद मिटला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version