spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दलची डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती सोमवारी ३१ ऑक्टोबरला समोर आली होती. यानंतर शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २ किंवा ३ नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर सध्या रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. त्यांना आज सकाळी अकरा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. मात्र, आता आजही शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : 

Kartiki Ekadashi 2022 : यावर्षीची कार्तिकी एकादशी कधी साजरी होणार? घ्या संपूर्ण माहिती जाणून

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानतर राष्ट्रवादीने ट्विट करत याबाबतच माहिती दिली होती. त्यांनी त्यांनी असे म्हटले होते की, २ नोव्हेंबरला संध्याकाळी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर ३ तारखेला शरद पवार हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.४ ते ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी करू नये, अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र, आता शरद पवार यांना बरं होण्यास आणखी एक-दोन दिवस लागणार असल्याने त्यांचा शिर्डी दौराही रद्द झाला आहे.

खोके सामनामध्ये पोहोचले का? मनसेचा खोचक सवाल

शरद पवार अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, त्यांना आणखी एक ते दोन दिवस बरे होण्यासाठी लागतील. त्यामुळे ते या शिबिराला हजर राहता येणार नाही. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.

दिल्ली हायकोर्टाने मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची दुसऱ्यांदा याचिका फेटाळली

Latest Posts

Don't Miss