spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

हनुमान जयंतीच्या निमित्त अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. रवी राणा आणि नवनीत राणा आणि ठाकरे कुटूंब वाद गेल्या वर्षांपासून सुरु आहे.

हनुमान जयंतीच्या निमित्त अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. रवी राणा आणि नवनीत राणा आणि ठाकरे कुटूंब वाद गेल्या वर्षांपासून सुरु आहे. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आज नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा म्हणाल्या की, उद्धव ठाकरे तुमचा घमंड देवानेच ठेचला., तुम किस खेत की मुली हो? ५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही. स्वतः च्या पक्षातले आमदार सांभाळू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाही. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं ते ते टिकावू शकले नाहीत. महाराष्ट्र काय बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) डोळ्यातही अश्रू असतील त्यांची विचारधारा बुडवण्याचे काम त्यांच्याच मुलाने केले अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त राणा दाम्पत्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर घणाघात केला आहे. खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आज जर कुणी हनुमान चालीसा म्हटली तर आपल्याला कोणी लॉकअपमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा पठण केले म्हणून देशद्रोह खटला भरणार नाही. देशाच्या विरोधात काम करतोय असं कुणी म्हणणार नाही. ज्या भूमीवर आपण सगळे जन्मलो ती देवभूमी म्हणजेच हिंदुस्तान, दगडातही देव शोधतो, आपली भक्ती आस्था जोडली आहे. आपण मातीच्या घरात असो किंवा महालामध्ये राहत असो तरी देवाला सर्व जण मानतात. परंतु ज्या राज्याला संताची भूमी म्हणून ओळखले जाते आहे त्याच महाराष्ट्रामध्ये ३३ महिन्याच्या सरकारने हनुमान चालीसा पठण केल्यामुळे जेलमध्ये टाकण्यात आले. आम्हाला अधिकार नव्हता का? मुंबईमध्ये पाय ठेवला तर तुम्हाला गाडून टाकू अशी भाषा वापरली गेली तेव्हा महिला म्हणून मला काय वाटले असे? असं नवनीत राणा यांनी सांगितले.

पुढे नवनीत राणा म्हणाल्या की, अमरावतीने मला लढायला शिकवले, विदर्भाची सून म्हणून मी मुंबईत दाखल झाली. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदारांना घारातून अटक करण्यात आली . त्यांची चूक काय होती? हनुमान पठाण करण्यासाठी आम्ह धमकी नव्हती तर विनंती केली होती. २५-३० पोलीस घरामध्ये घुसले. तेव्हा आम्ही सांगितले होते की आम्ही महाराष्ट्राला डाग लावून देणार नाही असं आम्ही सांगितलं होत. तरीही बळीराजाने आम्हाला वाहनात बसवून पोलीस स्टेशनला नेले तेव्हा काय वाटले असेल? असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी केला.

हे ही वाचा : 

सलमानच्या आधी या सुपरस्टारची निवड झाली होती ‘मैने प्यार किया’ चित्रपट

ठाणे रेल्वे स्थानकात आता हॅलीकॉप्टरचाही थांबा, पुनर्विकास आराखडा तयार

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमधील शाल्व किंजवडेकर झळकणार नव्या मालिकेत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss