सत्तांतरानंतर महाविकास आघाडीची पहिली बैठक

सत्तांतरानंतर महाविकास आघाडीची पहिली बैठक

महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आज दि. २३ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता लवकरच महापालिका निवडणूक पार पडणार आहेत. याच विषयी महाविकास आघाडीची खलबतं होतील अशी माहिती मिळत आहे.

संध्याकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे. महाविकास आघाडीचं भविष्य आणि विधीमंडळातील रणनीती याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या बैठकीला येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधानमंडळात येणार आहेत.

अजित पवार म्हणाले की, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी या सगळ्यांसह आमचं ठरलं की, आज एकत्रित बैठक घेऊया. कारण अधिवेशन पहिल्या आठवड्यात दोन दिवस झालं. दुसरा आठवडा सुरु झाला आहे. विरोधी पक्ष एकत्रितपणे सत्ताधारी पक्षाच्या समोर विरोधक म्हणून जातोय. आम्ही आमची एकी टिकवण्याचा प्रयत्न करतोय, एकी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अशावेळी उद्धव ठाकरेंना विनंती केल्यानंतर मी येतो संध्याकाळी असं आश्वासन दिलं. तेही त्यांच्या परीने मार्गदर्शन करतील आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही जे राहिले आहोत, त्यांच्यात एक चांगला उत्साह निर्माण होईल, एक चांगला मेसेज जाईल.”

तसेच विरोधक पक्षनेते अजित पवार यांनी गोविंदाच्या मृत्यूवरुन राज्य सरकारला इशाला दिला आहे. मुंबईत संदेश दळवी (वय २४ ) या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. कुर्ल्यातील शिवशंभो पथकातील हा गोविंदा होता. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. तसेच, भाजप १० लाखाची मदत करेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत मिळणार, जबर जखमी झालेल्या गोविंदांना साडे सात लाख रुपये मिळणार अशी घोषणा केली होती. जखमी गोविंदांना तातडीने मदत द्या. अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच, यावेळी भाजप १० लाखाची मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

हे ही वाचा :-

‘तारीख पे तारीख’चं सत्र सुरु, २४ तासांत दुसऱ्यांदा तारीख बदलली

ऑनलाइन फसवणुकीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा – सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version