spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री शिंदे व अमित शहा यांच्या भेटीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

मुंबई : गेल्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला 60:40 असा ठरल्याचे समोर येत आहेत.

अमित शहा आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी दरम्यान,31 जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदेंनी पाच वेळा दिल्लीवारी केली. पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच हा निर्णय घेतला जाईल. मंत्र्यांची यादी मात्र मुंबईत गेल्यावर निश्चित करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये शिंदे गट-भाजप युतीचे व्यापक मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकेल. शिंदे गट आणि भाजप यांच्या अनुक्रमे १४ व २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल.

हेही वाचा : 

आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा कार्यवाही करा, अजित पवारांचा राज्य सरकारला इशारा

Latest Posts

Don't Miss