spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा

सध्या गुजरातच्या निवडणुकीला (Gujarat elections) वेग आला आहे. रोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपचे खेळ बघायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गुजरातच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) १०० तोंडी रावण म्हटल्यानंतर भाजपने गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे म्हटले. मात्र, जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली. भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

पुढे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महसूलमंत्री (Minister of Revenue) विखे पाटील (Vikhe Patil) यांच्या वक्तव्याचा सुद्धा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. भगतसिंग कोश्यारीं विरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान असल्याचे शिवसेनेने म्हटले. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपतींच्या संदर्भात अपमानास्पद विधाने करावीत हे विखे पाटील सहन करू शकतील. सध्या ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे हे धोरण असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यपालांविरुद्ध लोकभावना भडकलेल्याच आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचे समर्थन करत असल्याचे दुःख असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले.

हे ही वाचा : 

मोठी बातमी ! बंजारा समाजचे नेते अनिल राठोड यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

नवंवर्षाच्या सुरवातीलाच राज ठाकरे यांची तोफ कोकणात धडाडणार

उदयनराजेंची आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा, ‘पुढे काय होईल ते बघून घेऊ’

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss