सरकारने शरद पवार यांना निमंत्रण देणं टाळलं, राजकीय चर्चांना उधाण

सध्या राज्याच्या राजकीय अनेक दिवसांपासून वेगवेगळे बदल घडत आहेत.

सरकारने शरद पवार यांना निमंत्रण देणं टाळलं, राजकीय चर्चांना उधाण

सध्या राज्याच्या राजकीय अनेक दिवसांपासून वेगवेगळे बदल घडत आहेत. राजकारणात घडत असलेल्या गोंधळांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बारामतीमध्ये (Baramati)नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राज्यसभेचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहण्यास मला आवडेल, अश्या आशयाचे पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव लिहिण्याबद्दल शिष्टाचार विभागाला कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांना निमंत्रण देण्याचे टाळण्यात आले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासंदर्भात राजशिष्टाचार विभागाने शरद पवार यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्याबद्दल विचारल्यानंतर शरद पवार कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्या आशयाचे पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. हे सर्व असूनसुद्धा निमंत्रण पत्रिकेवर सरकारच्यावतीने शरद पवार यांचे नाव छापण्यात आले नाही. शरद पवार यांनी राजशिष्टाचार मंडळाला निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकू नये, अश्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शरद पवार यांना निमंत्रण देणे, सरकारने टाळले आहे, अश्या चर्चांना सगळीकडे उधाण आले आहे.

राजशिष्टाचार विभागाला शरद पवार यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. असे असूनसुद्धा त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आले आहे. शरद पवार केवळ तुळापूरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत का? याबद्दल विचारल्यानंतर शरद पवार यांच्या कार्यालयाकडून उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

राजन साळवी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, पत्नी आणि भावाला एसीबीची नोटीस

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर…, अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version