अंगणवाडी सेविकांच्या पदरामध्ये अजून निराशाच, बाळासाहेब थोरात

अंगणवाडी सेविकांच्या पदरामध्ये अजून निराशाच, बाळासाहेब थोरात

कोरोनाच्या काळामध्ये स्वतः च्या जीवाची बाजी लावून आरोग्य सेवा पुरवत असलेल्या अंगणवाडी (Anganwadi) सेविकांची मागणी पूर्ण होत नसल्याने त्याच्या पदरी निराशाच पडतेय. जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांची एकही बैठक घेण्यात आली नाही अशी धक्कादायक माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे आणि त्यांनतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे आणि त्यांनी टाईम महाराष्ट्रला (Time Maharashtra) एका मुलाखतीमध्ये त्यांची मते सांगितली आहेत. नक्की काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की आजचे मंत्रिमंडळ महोदयांचे उत्तर योग्य नव्हते. ज्या काही अंगणवाडीच्या सेविका आहेत आणि ज्या काही अंगणवाडीच्या मदतनीस आहेत आणि आशा भगिनी सुद्धा त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जे काही ग्रामीण भागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचे कुटुंब त्यांना चालवायचे आहे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे संपूर्ण सभागृह म्हणत आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. १०० सदस्यांनी प्रश्न विचारले होते एवढे प्रश्न त्यांच्याशी निगडित विचारले जातात तर सरकारला यावर काही तरी उपाय काढणे गरजेचे आहे.

पुढे बाळासाहेब थोरात म्हणाले कि नाही तिथे तुम्ही खर्च करत आहेत आणि जिथे खर्च करायला पाहिजे तिथे तुमचे लक्ष नाहीये. तुम्ही निधीचा उपयोग योग्य त्या ठिकाणी करत नाहीयेत आणि निधी ची उधळपट्टी चालू आहे. अंगणवाडीच्या सेविकांना मदत केली पाहिजे दिलासा दिला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे परंतु हे चित्र वेगळेच चालले आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले. जिकडे नकोय तिकडे सरकारची उधळपट्टी चालू आहे आणि जिकडे हवी तिकडे नाही तुम्ही सध्या ऑफिसमध्ये राहिल्याने काही फरक पडणार नाहीये परंतु त्या ऑफिसमध्ये तुम्ही खर्च करता परंतु तुम्ही गरीब ज्या सेविका आहेत त्याच्या साठी तुम्ही काटकसर करता हि दुर्दैवाची अवस्था आहेत .

महाविकास आघाडीच्या वेळेला अंगणवाडी सेविकांची एकही बैठक घेण्यात आली यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की आमचे जेव्हा सरकार होते तेव्हा २ वर्ष हि कोरोना काळाची होती तरीसुद्धा जेव्हा आमचे सरकार होते तेव्हाच्या मंत्री महोदय यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांना या पाठीशी उभे राहणाऱ्या होत्या. त्यांनी अंगणवाडी सेविकांना प्रस्ताव पाठवला होता आणि तेवढ्याच काळात सरकार पडले. आणि त्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्तेचा तणाव होता जेव्हा वातावरण नीट झाले तेव्हा आमचे सरकार गेले आहे हि आम्हाला त्यांना मदत करायची संधी होती ती संधी दुर्दैवाने आम्ही घेऊ शकलो नाही. किमान वेतन हे सरकारला कायद्यानेच द्यावे लागते आणि शेतमजुराचा सुद्धा तुम्हाला किमान वेतन हे द्यावे लागते तो तर कायदाच आहे तो त्यांचा हक्कच आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version