spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

#SuperFastCM ट्विटरवर हॅशटॅग ‘सुपरफास्ट सीएम’चा ट्रेंड बनावट?

राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने मोदी यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री यांची पाठ थोपटली. त्याचवेळी डबल इंजिनचे हे सरकार उत्तम काम करत आहेत, अशी कौतुकाची थापही मारली. आता महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. महामार्गामुळे विकासाला अन् उद्योगाला चालना मिळेल, असे सांगत मोदी म्हटले. यानंतर एकनाथ शिंदे हे ‘सुपरफास्ट सीएम’ म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत.

हेही वाचा : 

परभणीत स्कूल बस व एसटी बसची समोरासमोर धडक, २० जण गंभीर जखमी

मुख्यमंत्री शिंदे ट्विटवर ट्रेंड असताना एकनाथ शिंदे यांच्यासाठी #SuperFastCm असा हॅशटॅग वापरण्यात येत आहे. अनेकांनी समृद्धी महामार्गाच्या लोकर्पणावरून शिंदे यांचे आभार मानले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात सुरुवात झाली होती. फडणवीसांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. मात्र २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीने या रस्त्याच्या कामात हातभार लावला. मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून महामार्गाचे लोकार्पण शिंदेंच्याच काळात झाले. त्यामुळे महामार्गाचं सर्वाधिक श्रेय शिंदे यांनाच जात आहे.

एकनाथ शिंदे यांचं कौतुक करणारे अनेक ट्विट आज ट्विटरवर #SuperFastCM हॅशटॅग वापरून करण्यात आले आहेत. मात्र हे ट्विट हिंदी भाषिक लोकांनीच अधिक केल्याचं दिसून येत आहे. अनेक ट्विटमधील कंटेन्ट हिंदीतून दिसून येत असून एकनाथ शिंदे यांचे पोस्ट मराठीत आहे. त्यामुळे हा ट्रेंड मॅनेज तर नाही, अशी नेटकरी उपस्थित करत आहेत.

Dilip Kumar दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडलेल्या त्या नायिकांचे किस्से, तुम्हाला माहित आहे का?

कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “या महामार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे (Samruddhi highway) यांचे नाव दिले, याचा आनंद फार मोठा आहे. आम्हीच काम सुरू केले आणि आमच्याच कारकिर्दीमध्ये लोकार्पण करतोय, ही भाग्याची गोष्ट आहे. भूमी अधिग्रहणामध्ये अनेकांनी अडचणी आणल्या. पण मोपलवार, गायकवाड, परदेशी आदी सर्व अधिकाऱ्यांच्या साथीने आम्ही त्यावर मात केली. शेतकऱ्यांना विश्‍वास दिला, आरटीजीएसच्या माध्यमातून तात्काळ पैसा त्यांच्या खात्यात जमा केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास आम्ही जिंकला. त्यामुळे पुढचे काम सुरू झाले. हा इको फ्रेंडली रस्ता आहे. ३५ लाख झाडे लावणार आहोत. असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Virat-Anushka Anniversary आधी भांडण मग प्रेम, अशी सुरू झाली अनुष्का-विराटची रंजक प्रेमकहाणी

Latest Posts

Don't Miss