विभागप्रमुखांनी प्रश्न विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला राग

शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले. मात्र असे असले तरी पक्षांतर्गत कलह सुरुच आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार असून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

विभागप्रमुखांनी प्रश्न विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला राग

शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले. मात्र असे असले तरी पक्षांतर्गत कलह सुरुच आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार असून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्या आधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणण्यात येणार असून लाखोंची गर्दी जमवण्याची तयारी सुरु आहे. शिंदे गटाचे आमदार आणि स्थानिक नेत्यांची त्याची जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे.

सध्या रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम शिवसेना शिंदे गटात असून ते दररोज शिवसेना ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. अशा प्रसंगी रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत? त्यांची हकालपट्टी अजून का केली नाही? असे प्रश्न विभागप्रमुखांनी विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर राग व्यक्त केला असल्याची माहिती दिली जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाची काल शिवसेना भवनात दसरा मेळावा (Dasara Melava) पूर्व तयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत कसे? असा प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला.

शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारला? यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारुन घेऊ, असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभागप्रमुख चांगलेच भडकले.

हे ही वाचा:

Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

Navratri 2022 : लालबागची माता नवरात्रोत्सवनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Black Panther 2 Trailer : बहुचर्चित ‘ब्लॅक पॅंथर २’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version