सत्तासंघर्षावरील सुनावणी आता २९ ऑगस्टला होण्याची शक्यता

शिवसेनेशी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदारांना घेत गुवाहटी गाठली होती. त्यानंतर शिवसेनेचे आपल्या आमदारांनी व्हीप न पाळल्यावरून गेलेल्या १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे सुनील प्रभू यांना काढून टाकत भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केली होती.

सत्तासंघर्षावरील सुनावणी आता २९ ऑगस्टला होण्याची शक्यता

शिवसेनेशी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदारांना घेत गुवाहटी गाठली होती. त्यानंतर शिवसेनेचे आपल्या आमदारांनी व्हीप न पाळल्यावरून गेलेल्या १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे सुनील प्रभू यांना काढून टाकत भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केली होती. त्यानंतर या निवडीवर आक्षेप घेत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या वादावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत असून आता ही सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे उद्या निवृत्त होत आहेत. त्यांच्यासमोरच आज शिवसेनेची याचिका पटलावर येईल असे म्हटले जात होते. मात्र या प्रकरणी आज काही सुनावणी होईल, याची शक्यता मावळली आहे. उद्यापासून उदय ललित हे नवे सरन्यायाधीश पदभार हाती घेतील. त्यानंतर सोमवारी त्यांच्यासमोरच या खटल्यावरील पुढील सुनावणी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आज २५ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या (Shivsena) याचिकेवर सुनावणीची तारीख मागील वेळी कोर्टाने दिली होती. मात्र दुपारपर्यंत ही याचिका कोर्टाच्या पटलावर लीस्टच करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचिका पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. २३ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना विरोधा एकनाथ शिंदे हा खटला घटनापीठासमोर मांडण्यात येईल, असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर आज या प्रकरणी कोर्ट काय निर्देश देते, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मात्र आज दुपारपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या पटलावर ही याचिका लीस्ट झालेली नाही. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा :-

.. त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले, आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य

अजित पवार आणि आंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version