सांगलीतील शिवसेना नगरसेविकेच्या नवऱ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांन कडून जबर मारहाण

सांगलीतील शिवसेना नगरसेविकेच्या नवऱ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांन कडून जबर मारहाण

सांगलीतील शिवसेना नगरसेविकेच्या नवऱ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांन कडून जबर मारहाण

इस्लामपूर : सांगलीतील इस्लामपूर येथील शिवसेना नगरसेविकेच्या नवऱ्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांकडून शिंदे गटात सामील होण्यासाठी ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिभा शिंदे व त्यांच्या पतीने केला आहे. शिवकुमार शिंदे यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

इस्लामपूर नगरपालिकेच्या नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना करण्यात आलेल्या मारहाणीमध्ये त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. शिवकुमार शिंदे हे सकाळी दूध आणायला गेले असताना त्यांच्यावर आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. “तुम्ही शिंदे गटात सहभागी व्हा, नाहीतर तुमचे घर उध्वस्त करू” अशी धमकी आनंद पवार यांनी दिली होती, त्यानंतर आम्ही आमचा राजीनामा वर पाठवला होता. पण त्यांनी आज सकाळी माझ्यावर हल्ला केला असा आरोप जखमी असलेले शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून हल्लेखोरांचा लवकरच शोध घेऊन अटक केली जाईल,अशी माहिती इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सचिव श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषद

Exit mobile version