spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्या बीडमध्ये विनायक मेटेंच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांचे आज अपघाती निधन झाल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज संध्याकाळपर्यंत विनायकराव मेटे यांचे पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. तर उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम (Shivsangram) भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून मिळाली आहे.

उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. राजकीय नेते गोपीनाथ मुंडेंच्या (Gopinath Munde) निधनानंतर बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा एक चांगला आणि दर्दी नेता गमावला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.याआधी आज विनायक मेटे यांचे पार्थीव मुंबईतील (Mumbai) त्यांच्या वडाळ्यातील भक्तीपार्क येथील त्यांच्या घरी नेले जाणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी शिवसंग्रामचे कार्यकर्ते तसेच अन्य नेते जमत आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या मेटे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रम्यान, मेटे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. त्यासाठी पोलिसांची आठ पथकं नेमण्यात आली आहेत. तर दुसरीकडे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhjiraje) यांनी विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. रस्त्यांवर आपत्कालीन मदतीसाठी सरकारची काय योजना आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss