spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मागून आलेल्यांना मंत्रिपद मिळालं; शिरसाटांनी व्यक्त केली नाराजी

अरे आमच्याकडेही पाहत जा जरा, आजकल सिनीअरीटिचं काही राहीलच नाही

शिंदे – फडणवीस सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ अशा १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांना खातेवाटप देखील करण्यात आले. पण आता दुसऱ्या टप्प्यात नक्की कोणाला नेत्यांना संधी मिळणार अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. आणि या पदांकरीता इच्छुक नेत्यांची यादीसुद्धा बरीच मोठी आहे. मागून आलेल्या अतुल सावेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असून, आता आमच्याकडेही पहा असे औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.

मंत्रिपदाकरिता औरंगाबादमधून एकूण ३ नेत्यांना संधी देण्यात आली. या ३ नेत्यांपैकी एक नाव तर संजय शिरसाट यांचच असणार, अशी चर्चा शेवट्पर्यंत सुरु होती. मात्र आयत्यावेळी त्यांच्या नावाच्या जागी अब्दुल सत्तार यांचे नाव आले आणि संजय शिरसाट यांचे नाव पुन्हा एकदा वेटिंग लिस्टमध्ये गेले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात संधी न दिल्यामुळे संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. तसेच पुढच्या यादीत आपला नंबर निश्चित असल्याचा दावा शिरसाट यांच्याकडून सतत केला जात आहे.

पुढे शिरसाट म्हणाले की, अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केलं आहे. त्यामुळे अतुल सावे यांना ते कधी राजकरणात घेतील असे मला वाटले नव्हते. मात्र अतुल सावे मागून आले काय, राज्यमंत्री झाले काय, कॅबिनेट मंत्रीही झाले काय, सगळचं झालय. अरे आमच्याकडेही पाहत जा जरा, आजकल सिनीअरीटिचं काही राहीलच नाही, असे म्हणत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात आज विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शहरातील रोपळेकर हॉस्पिटल ते जवाहरनगर पोलीस स्टेशनपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संजय शिरसाट यांच्यासह कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि संदिपान भुमरे उपस्थित होते.

हे ही वाचा:

MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, उदय सामंतांच स्पष्टीकरण

Latest Posts

Don't Miss