शिंदे गटातील नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, हिंमत असेल तर

उद्धव ठाकरेंमध्ये (Uddhav Thackrey) हिंमत असेल तर त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवुन दाखवावी, असं खुलं आव्हान शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Shinde group MP Prataprao Jadhav) यांनी दिलं आहे.

शिंदे गटातील नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, हिंमत असेल तर

उद्धव ठाकरेंमध्ये (Uddhav Thackrey) हिंमत असेल तर त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवुन दाखवावी, असं खुलं आव्हान शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Shinde group MP Prataprao Jadhav) यांनी दिलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याच्या सभेमध्ये त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. ठाकरे यांच्या या टिकेला जाधवांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी थेट उद्धव ठाकरें यांना आव्हान दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांचं भविष्य, भावना गवळींची राखी आणि देवेंद्र फडणवीस यांची लाज काढत उद्धव ठाकरेंनी बुलढाण्याच्या चिखलीमधून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याचं रणशिंग फुंकलं. ज्या चिखलीत त्यांनी सभा घेतली, तिथले आमदार-खासदार त्यांना सोडून गेले होते, पण ठाकरेंना त्याचा काडीमात्र फरक पडला नाही. उलट अधिक त्वेषाने ते भाजप शिंदे गटावर तुटून पडले. गेलेल्यांचा मुखवटा खोटा होता. आता जे राहिलेत ते माझे सैनिक आहेत, असं म्हणत त्यांनी सोबतीच्या साथीदारांचा शूरवीर म्हणत उल्लेख केला. त्यांच्या सभेला विदर्भातील शिवसैनिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. याच सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर जोरदार तोफ डागली. त्यांच्या याच टीकेला आता खासदार जाधव यांनी उत्तर दिलं आहे.

भाजप आमचा जुना मित्रपक्ष आहे. जुन्या मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही याआधीच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत आणि इथून पुढं येणाऱ्या सगळ्या निवडणुका देखील आम्ही भाजपसोबतच लढणार. पण भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा प्रश्न येतो कुठे? उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात बुलढाण्यात येऊन निवडणूक लढवावी, असं खुलं आव्हानच प्रतापराव जाधव यांनी दिलं आहे. मी पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे. भाजपकडून लढण्याचा विषय येतो कुठे? आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालतो आहोत, इथून पुढेही त्यांचे विचार घेऊनच पुढे जाऊ, असं प्रतापराव जाधव म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी चिखलीमध्ये घेतलेल्या शेतकरी सभेमध्ये शिंदे गटातील खासदार आणि आमदारांनाही आव्हान दिलं होतं . बुलढाण्यातले गद्दार खासदार आणि गद्दार आमदार त्यांच्यामध्ये मर्दांनगी शिल्लक असेल तर भाजपकडून लढणार नाही, हे त्यांनी स्पष्ट करावं. ह्यांना नाव बाळासाहेबांचं पाहिजे, चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे, पक्ष शिवसेना पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा पाहिजे… अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदार-खासदारांवर टीका केली होती.

हे ही वाचा:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई गटध्यक्ष मेळावाच्या सभास्थळी रवाना

राज ठाकरेंचा राहुलगांधींवर खरपुस शब्दांत टीका

Raj Thackeray melava LIVE : कोरोना काळात ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version