spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

’त्या’ १२ आमदारांची यादी होणार रद्द, राज्यपालांनी दिली मान्यता

त्यानंतर राज्यपालांनी अखेरीस ही यादी मागे घेण्यास मंजुरी दिली आहे

राज्यपालांकडून मंजुरी मिळणाऱ्या 12 आमदारांच्या (12 MLC list )यादीवरुन उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराचवाढ सुरु होते. अखेरपर्यंतशिवसेनेने दिलेली 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केली नव्हती. आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही 12 नावांची यादी मागे घेण्याचे पत्र (withdrawal)राज्यपालांना लिहिले होते. त्यानंतर राज्यपालांनी अखेरीस ही यादी मागे घेण्यास मंजुरी दिली आहे. 2020 साली ही 12 आमदारांची यादी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याकडून देण्यात आली होती. ती यादी अखेरीस रद्द करण्यात आली आहे.

राज्यपालांनी दोन वर्षे ही यादी रोखून धरल्याचा आरोप करत, यावरुन महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपात अनेकदा वादही झाला होता. भाजपासाठी ही यादी रोखून धरल्याचा आरोप मविआ नेत्यांकडून करण्यात आला होता. 12 जणांच्या नावांच्या महाविकास आघाडी सरकारच्या यादीला राज्यपालांनी मंजुरीही दिली नव्हती, तसेच त्यांनी ही यादी फेटाळलीही नव्हती. ही 12 नावांची यादी राज्यपालांकडे दोन वर्षे पडून होती. त्यांनी या 12 सदस्यांना विधान परिषद आमदारकी दिलीच नाही.

उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे 2020साली ही यादी दिली होती. त्यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानगुडजे-पाटील आणि चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश होता. तर राष्ट्रवादीकडून शेतकरी नेते राजू शेट्टी, एकनाथ खडसे, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांचा समावेश होता. काँग्रेसकडून रजनीताई पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वानकर आणि मुझफ्फर हुसेन अशा चार नावांचा समावेश होता.पण राज्यपालांनी काही निर्णय न घेतल्यामुळे ती आता रद्द झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही निदर्शनास आणून दिली होती. राज्यपाल जाणूनबुजून या १२ आमदारांची नियुक्ती करीत नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

हे ही वाचा:

आज शिक्षकदिन जाणून घेऊया… डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल

लालबागच्या राजासाठी केले खास उकडीचे मोदक, अभिनेत्री ऋतुजाचा व्हिडिओ व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss