मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक संपली, ‘या’ प्रमुख मुद्यांवर झाली चर्चा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक संपली, ‘या’ प्रमुख मुद्यांवर झाली चर्चा

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण हे चांगलंच तापलं आहे. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये नेमकं कश्या बदल चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर बैठक सम्पल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्या नेहमी समोर येत असतात. याचाच विचार करुन अमित यांनी आज सहकार क्षेत्रासी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली. सहकार क्षेत्राशी (Cooperative Sectors) संबंधित बैठकीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar), धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) हे सुद्धा नेते दिल्लीत अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. या बैठकीनंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाली. या बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यपालांच्या निवृत्तीबद्दल उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांनी यापूर्वीही निवृत्तीबद्दल (retirement) सांगितलं होतं. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या काळात आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी सुपारी दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलतांना मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचंही सूतोवाच केलं आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी अनेक नेते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने काहींनी जाहीरपणे नाराजीदेखील बोलून दाखवली होती.

फडवीसांच्या तात्कालिन महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Govt) केलेल्या या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा फडणवीसांनी मला अटक करण्याचे आदेश वळसे पाटलांचे नव्हते म्हणत सस्पेंस वाढवला आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी माध्यमांना बोलताना सांगितले की, हे मी अतिषय सत्य सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात कशाही प्रकारे मला कारागृहात टाकण्याचा तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होता. याची सुपारी तत्कालिक मुंबईचे पोलिस कमिशन संजय पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी प्रयत्न करून पाहिले पण ते यशस्वी झाले नाहीत. यातली काही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना देखील आहे. फर्स्ट हॅंड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

IND vs NZ 3rd ODI रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ३ वर्षांनंतर हिटमॅनने झळकावले ODI शतक

माझी सुपारी संजय पांडे यांना दिली होती, देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version