राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्रित खंजीर हे चिन्ह द्यायला हवं होतं; पडळकरांची टीका

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्रित खंजीर हे चिन्ह द्यायला हवं होतं; पडळकरांची टीका

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यामध्ये अंतर आलं पाहिजे, असं शरद पवारांनी (sharad pawar) म्हटलं होतं. त्यांना शिवसेनेला पूर्णपणे संपवायचं होतं, ते त्यांनी केलं, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते. एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं, असं मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता मी प्रत्यक्षात बघितलं. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होत आहे. आता शिवसेनेचं काय झालं ते आपल्या समोर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘राष्ट्रवादीसोबत जाणारे संपतात, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या बाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं,’ असा खोचक टोला भाजपचे विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकर यांनी लगावला आहे. निवडणूक आयोग कोणताही दुजाभाव करत नाही. उलट शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र करून आयोगाने खंजीर हे चिन्ह द्यायला हवे होते, अशी खोचक टीकाही पडळकर यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना पडळकरांनी “जयंत पाटील अक्कल नसलेला माणूस आहे. त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका, तुमची आयडीयालॉजी काय होती. तुम्ही शिवसेनेशी जुळवून घेत होता. तेव्हा सुद्धा तुम्ही सत्तेसाठीच लाचारी पत्करली होती. आशा भाषेत पाटलांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सत्तेशीवाय राहू शकत नाही अशी टीका केला होती.

बारामती लोकसभा मतदारसंघ यावेळी भाजपच जिंकेल. राष्ट्रवादीने कितीही वल्गना केल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आपला लोकप्रतिनिधी असावा, अशी जनतेची इच्छा आहे, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. बारामती लोकसभा लढवण्याचा निर्णय महादेव जानकर यांनी घेतला असल्याच्या प्रश्नावर पडळकर म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष हा आमचा मित्रपक्ष आहे. घटक पक्षासंबंधी मी बोलू शकत नाही. परंतु यासंबंधी रासपचे संस्थापक महादेव जानकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रित बसून मार्ग काढतील, अशी माहिती पडळकर यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Wardha Elections : वर्धा जिल्ह्यात थेट जनतेतून सरपंचाची निवड

शरद पवारांकडून भुजबळांची स्तुती ; त्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version