NDA चे सरकार कोसळणार… सरकार मधील घटक पक्ष आमच्या संपर्कात ; राहुल गांधी

"सरकारकडे संख्याबळ इतकं कमी आहे त्यामुळे जरा काही गडबड झाली तरी सरकार पडू शकते. ज्यामुळे NDA च्या काही घटक पक्षांना दुसरीकडे जाऊ लागते. अशी परिस्थिती उपस्थित झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. NDA मधील काही घटक पक्ष  माझ्या संपर्कात आहे. ते मोदी यांच्या नेतृत्वात असमाधानी आहेत."

NDA चे सरकार कोसळणार… सरकार मधील घटक पक्ष आमच्या संपर्कात ; राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात NDA सरकारची सत्तास्थापना झाली आणि पुन्हा एकदा मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्याचसोबत दिग्गज खासदारांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनतर संपूर्ण देशाचा कारभार चालवायला सुरुवात केली. परंतु याच NDA सरकारला तिसऱ्या कार्यकाळातं अस्तित्वासाठीच संघर्ष सुरु झाला आहे.

केंद्रात NDA चे संख्याबळ खूप कमी आहे. त्यामुळे जराही गडबड झाली तर लगेच कोसळूही शकते. असा दावा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संगितले. त्यांनी असे म्हटले की –

“सरकारकडे संख्याबळ इतकं कमी आहे त्यामुळे जरा काही गडबड झाली तरी सरकार पडू शकते. ज्यामुळे NDA च्या काही घटक पक्षांना दुसरीकडे जाऊ लागते. अशी परिस्थिती उपस्थित झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. NDA मधील काही घटक पक्ष  माझ्या संपर्कात आहे. ते मोदी यांच्या नेतृत्वात असमाधानी आहेत.” 

परंतु त्यांच्या संपर्कातील पक्षांची नवे त्यांनी संगितली नाही. त्याचप्रमाणे द्वेषपूर्ण राजकारण भारतातील जनतेनं नाकारले आहे. २०१४ आणि २०१९ या कार्यकाळात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी काम केले ते काम आता करू शकत नाही. लोकसभा निकालात इंडिया आघाडीला (IND)२३४ जागा मिळाल्यात. तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे (NDA) २९३ जागा आहेत. राहुल गांधी भारतीय राजकारणात खूप पुढे गेलेत. लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी राहुल गांधींना मिळू शकते असं काँग्रेस (Congress) नेते सांगत आहेत.

दरम्यान, ज्या पक्षाने मागील १० वर्ष अयोध्येचं सांगत घालवले त्यांना अयोध्येत हरवलं आहे. भाजपा धर्माच्या नावावर राजकारण करून द्वेष पसरवत आहे. विरोधी पक्षाने जी चांगली कामगिरी केली त्यात भारत जोडो यात्रेचं मोठं योगदान आहे. नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली परंतु मागील २ लोकसभेप्रमाणे यंदा भाजपा (BJP) स्वबळावर बहुमताचा आकडा पार करू शकली नाही.

सरकार बनवण्यासाठी त्यांना एनडीएच्या घटक पक्षावर निर्भर राहावं लागतंय असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi)  वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडून आले. त्यात राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघ सोडला. त्याठिकाणी आता काँग्रेसकडून पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रियंका गांधीही संसदेत दिसतील असं चित्र सध्या दिसत आहेत.

हे ही वाचा

मुंबई आरोग्य विभागात नवी भरती ; जणूयात सविस्तर

FYJC ADMITION: कला, वाणिज्य आणि विज्ञान कोणत्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल ?

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version