Sunday, July 7, 2024

Latest Posts

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ; नवनिर्वाचित खासदार थेट शिवतीर्थावर रवाना

राजकीय नाट्यात राज ठाकरे यांची गत 'गरज सरो आणि वैद्य मरो' अशी काहीशी झाली आहे.

दिल्ली येथे ९ जून रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा शपथविधी पार पडला. परंतु या शपथविधी सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आमंत्रण न दिल्याने मनसेत मोठ्याप्रमाणावर नाराजीचे सूर उमटत आहेत. या राजकीय नाट्यात राज ठाकरे यांची गत ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी काहीशी झाली आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी गुरुवारी सर्व पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या तीन नेत्यांनी मनसे(MNS) प्रमुखांची शिवजी पार्क (Shivaji Park) येथील निवासस्थानांची म्हणजे शिवतीर्थावर (Shivtirth) भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे- फडणवीस – पवार सरकार मधील मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske), शिवसेना मुंबई पदवीधर मतदार संघाचे दिपक सावंत (Deepak Sawant) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यांसंदर्भात नरेश म्हस्के यांचे उद्गार

नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की-” राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली, त्यामुळे निवडून आल्यावर त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांनी ठाण्यात प्रचारासाठी खूप मदत केली होती.त्याचाच फायदा यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी झाला. काही लोकं विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करत आहेत. एकिकडे हिंदू म्हणतात आणि दुसरीकडं पाठीमागच्या दरवाजाने मदत घेत आहेत. जागा वाटप हे मीडिया समोर येऊन करायच नसतं. बैठक होईल त्यामध्ये त्यांनी त्यांची भूमीका मांडायला हवी “

“सोमवारी शिवसेना भवनात बैठका झाल्या. त्या ठिकाणी असणारे खासदार यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. खासदारांवर अविश्वास दाखवण्यात आला आहे. आम्हाला सुपारी बाज म्हणता मग आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलात, संजय राऊत तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या. जर आम्ही काम केलं नसतं, मतं दिली नसती तर आपण खासदार झाला नसता हे लक्षात ठेवा “ असं देखील नरेश म्हस्के बोलले.

शिंदे गटाचे शिवसेना मुंबई पदवीधर उमेदवार डॉ. दीपक सावंत हे देखील शिवतीर्थावर –

“महायुती (Mahayuti) तर्फे मुंबई पदवीधरसाठी लढण्याचे फाईनल झाले की, पाठिंबा देण्यासाठी हजर” असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. या पदवीधर मतदार संघासाठी यावेळी शिवसेना (Shiv Sena) व भाजप (BJP)आमने – सामने असणार आहेत. दरम्यान महायुतीमधून निवडणूक कोण लढवणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. जर येथून दीपक सावंत यांची निवड नक्की झाली की राज ठाकरे त्यांना पाठिंबा देतील हे निश्चित झाले आहे.

हे ही वाचा:

सहाय्यक उपनिरीक्षक पदभरती साठी अर्ज करायचा आहे तर, जाणून घ्या संपूर्ण पद्दती..

शेतकऱ्यांसाठी नवी खुश खबर ; पंतप्रधानांनी आणली ‘ही’ योजना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss