पुढची सुनावणी ३० जानेवारीला 

पुढची सुनावणी ३० जानेवारीला 

आज दुपारी ४ वाजल्यापासून निवडणुकीच्या सुनावणीला सुरवात झाली आहे. आणि या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्ती वाद सुरु केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची राष्ट्रीय कार्यकारणी बेकायदेशीर असल्याच त्यांनी सांगितलं.तर देवदत्त कामात (Devdutt Kamat) यांनी सुद्धा जोरदार युक्ती वाद केला. पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्याधी परवानगी द्या. तर एकनाथ शिंदे यांचा गट राजकीय पक्ष नाही. शिंदे गटाच्या तुलनेत आमच्याकडे संघटनात्मक संख्याबळ जास्त आहे, असं देवदत्त कामात यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेते पद बेकायदेशीर आहे. मुख्य नेतेपद हे शिवसेनेत नाही. तर सादिक अली केस (Sadiq Ali Case) इथे लागू होत नाही असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. आता पुढची सुनावणी हि ३० जानेवारीला होणार आहे. पण निवडणूक आयोगाने सोमवारी दोन्ही गटाला लेखी स्वरूपात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्याकडून मुख्य नेते पद हे बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं होत. त्यावर महेश जेठमलानी यांनी सांगितलं कि, मुख्यानेतेपद हे कायदेशीर आहे. तर शिंदेच्या बंडाने शिवसेनेत फूट पडल्याचं सुद्धा जेठमलानी यांनी सांगितलं आहे. तर आता महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद संपला.

येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. पण पक्षाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत सुरु असलेला कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय देईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे

Ved Marathi Movie, तिसऱ्या आठवड्यात देखील ‘वेड’चीच हवा, परंतु लोकांनी रितेशकडे केली एक अनोखी तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version