spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धनुष्यबाण चिन्हांबाबतीत पुढची सुनावणी २० जानेवारीला

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे.काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत . एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट शिवसेनेवर आणि धनुष्यबाण शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दावा सांगितला होता . त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात नेण्यात आले. आणि महाराष्ट्र सत्ता सत्तासंघर्षावरील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. पण शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे . याचे महत्वाचं कारण म्हणजे येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. पण पक्षाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत सुरु असलेला कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय देईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर धनुष्यबाण चिन्हांबाबतीत पुढची सुनावणी २० जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सुभाष देसाई हे उपस्थित होते. दरम्यान आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. शिवसेनेतला कोणतागी गट नाही तर कपोकल्पित आहे. शिवसेनेतील फूट म्हणजे कल्पना आहे. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. शिवसेनतील फुट आयोगाने ग्राह्य धरु नये, असे कपिल सिब्बल म्हणाले.

शिंदे गटाने दाखल केलेल्या कागदपत्रे बोगस आहेत. या कागपत्रांमध्ये त्रुटी आहेत. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला काय म्हटले. तसेच काही लोकांनी पक्षातून बाहेर पडणे हे बेकायदेशीर असल्याचे सिब्बल म्हणाले.

हे ही वाचा:

IBPS SO Result 2023 आईबीपीएस एसओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर, या पद्दतीने करा डाउनलोड

संजय राऊतांच्या त्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंना काढावी लागली समजूत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss