आज पार पडणार द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा…

द्रौपदी मुर्मू आज, सोमवारी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची म्हणजेच राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत.

आज पार पडणार द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा…

देशाच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, सोमवारी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची म्हणजेच राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. त्यावेळी त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.

आज, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी सकाळी सव्वादहा वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची शपथ देतील. शपथविधीनंतर त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाईल आणि त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भाषण करतील, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने देण्यात आलेली आहे.

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभाच्या समारोपानंतर, मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. तेथे त्यांना आंतर-सेवा गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात येईल. या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी, सरकारी विभागांतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतीपदाच्या लढतीत त्यांचे विरोधक यशवंत सिन्हा यांना ६४ टक्के मते मिळवून द्रौपदी मुर्मू यांनी पराभूत केले होते. सिन्हा यांना ३,८०,१७७ तर मुर्मू यांना ६,७६,८०३ मते मिळाली होती.

 

 

Exit mobile version