तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला ; पंतप्रधानांकडून कौतुक

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India Narendra Modi) यांनी 'मन की बात' ('Mann Ki Baat') कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केले.

तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला ; पंतप्रधानांकडून कौतुक

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ (‘Mann Ki Baat’) कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत ​​महोत्सवानिमित्त झालेल्या देशभरातील कार्यक्रमाचं कौतुक केलं. पंतप्रधान म्हणाले की, आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे.

पंतप्रधानांनी म्हटलं की, अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत ​​महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणि युवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृत धारा बरसत आहे. तसेच बोत्सवाना येथे राहणाऱ्या स्थानिक गायकांनी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी देशभक्तीपर ७५ गाणी गायली. विशेष म्हणजे हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या भाषांमध्ये ही ७५ गाणी गायली गेली. नामिबियामध्ये भारत-नामिबिया यांच्यातील सांस्कृतिक-पारंपारिक संबंधांवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे, असं पंतप्रधानांनी सांगितले.

पुढे पंतप्रधान म्हणाले, अमृत ​​महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे. कृष्णील अनिल जीहे या युवा सहकारी, एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला आहे. कर्नाटक मधील कोलार येथील लोकांनी ६३० फूट लांब आणि २०५ फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला. असे पंतप्रधानांनी सांगितलं.

हे ही वाचा :-

उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

आज रंगणार भारत – पाकिस्तान ‘महामुकाबला’

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version