अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलीस उपाशी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलीस उपाशी

Maharashtra Winter Session 2022 : आज पासून महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशनाला (Winter sessions) सुरवात झाली आहे आणि. आणि काही काहीदिवसांपासून नक्षलवाद्यांचे (Naxalists) साकारला येणारे धमकीचे पत्राच्या पार्शवभूमीवर नागपूर अधिवेशनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान या अधिवेशनात सुरक्षा बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना (police) जेवण मिळालं नसल्याने हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

नागपूर (Nagpur) येते होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी असलेलं जेवण संपल्याने अनेक पोलिसांची उपासमार झाली. सकाळपासून हे पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तावर आहेत. दुपारपर्यंत उभं राहूण कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना वेळेवर जेवण (food) मिळालं नाही. हिवाळी अधिवेशनानिमीत्त राज्यभरातून पोलिस नागपूरात दाखल झाले आहेत. विधानभवन परिसरात तसेच मोर्चा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था खासगी कंत्राटदारामार्फत त्या-त्या जागी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पोलिस तैनात आहेत त्या ठिकाणी बुफे पध्दतीने जेवण देण्यात येत होते. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं जेवण संपल्याने पोलिसांना उपाशी राहावं लागलं.

गेल्या अधिवेशनाच्या वेळी देखील हा प्रश्न समोर आला होता, तेव्हा देखील पोलिसांना उपाशी राहावं लागलं होतं. यावेळी पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं होतं, असं असून देखील पोलिसांना गैरसोय सगन करावी लागली. जेवण वेळेवर मिळालं नाही आणि मिळालं ते अपूरं असल्याची तक्रार समोर आली. या नंतर प्रशासनाला जाग आली असून पोलिसांना जेवण मिळावं म्हणून हलचालींना वेग आला.

हे ही वाचा : 

Merry Christmas 2022 ‘ख्रिसमस ट्री’ची सजावट करायचीय? मग या सोप्या डेकोरेशन आयडियाज नक्की करा ट्राय

हलाल मांसावरून कर्नाटकात गदारोळ, कर्नाटक सरकारच्या हलाल मांसविरोधी विधेयकाला काँग्रेसचा विरोध

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version