Dasara Melava : CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर आले समोर, आम्ही विचारांचे वारसदार…

Dasara Melava : CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर आले समोर, आम्ही विचारांचे वारसदार…

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. मंगळवारी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा ? पुढची लढाई कोण जिंकणार? या सगळ्याचा फैसला आता निवडणुक आयोगच करणार आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर आता एकनाथ शिंदेंचा गट दसरा मेळावाच्या तयारीला लागला आहे. अशातच शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी एक पोस्टर प्रसारित करण्यात आले आहे. सध्या या पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आम्ही विचारांचे वारसदार असं या पोस्टर मध्ये म्हटले आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो पोस्टरवर आहेत. तसंच पोस्टरवर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील आहे.

हेही वाचा : 

कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही,गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं? हा प्रश्न सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आणि त्याचं उत्तर अजूनतरी आलेलं नाही. तरी, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरवर धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलंय. त्यामुळे शिंदे गटानं पोस्टरमधून शिवसेनेला डिवचल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलीए. आता दसरा मेळाव्यालाच शिंदे आणि ठाकरेंची तोफ किती शक्तिशाली अवतारात धडाडणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय हे नक्की.

Amit thackeray : मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्काराचे मानकरी ठरले राज ठाकरेंचे सुपुत्र

Exit mobile version