सध्याचा काळ वैचारिक संघर्षाचा, पुन्हा जनतेचे राज्य आणू… रायगडावरुन शरद पवार यांची गर्जना

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात.

सध्याचा काळ वैचारिक संघर्षाचा, पुन्हा जनतेचे राज्य आणू… रायगडावरुन शरद पवार यांची गर्जना

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाले. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्यांच्या या चिन्हाचे अनावरण आज रायगडावर झाले आहे.

ही तुतारी एका संघर्षाला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रायगड किल्ल्यावर पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या अनावरण प्रसंगी बोलताना म्हटले आहे.

यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले. परंतु, रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलो आहोत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया, असेही शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले. पुढे पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया असेही आवाहन शरद पवार यांनी केले.

 

तसेच, यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतक-यांचा-महिलांचा-ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या-माझ्या महाराष्ट्राचा, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी किल्ले रायगडावर पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या अनावर प्रसंगी म्हटले..

हे ही वाचा:

गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version