समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम पंतप्रधानांनी केले, फडणवीस

आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभर ७७ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) हा साजरा केला जात आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम पंतप्रधानांनी केले, फडणवीस

आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभर ७७ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) हा साजरा केला जात आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले आहे.

यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमृत काळातील स्वातंत्र्य दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपला तिरंगा चंद्र सूर्य असेपर्यंत सन्मानाने डौलाने फडकत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ५०० विशेष अतिथींना बोलावल आहे. यात शेतकरी, उत्पादक कंपनीचे सामान्य कारागीर, सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार, बोलवण्यात आले आहेत. देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल आहे. “मेरी माटी, मेरा देश” या अभियानांतर्गत एका सन्मानाची अभिमानाची भावना आपल्या मनात तयार होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शेवटच्या माणसाचे स्वप्न पूर्ण करत विकासाकडे जात आहे.

यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, मला आज समाधान आहे. गडचिरोली पोलिसांनी दाखवलेल्या शौर्यासाठी या वर्षभरात त्यांना ६४ पदक मिळाली आहे. कदाचित देशात सर्वाधिक पदक गडचिरोली पोलिसांना मिळालेले आहे. त्यांच्या शौर्यासाठी, कार्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना ते मिळालेली आहे. पण काम संपलेले नाही. भटकलेला एक जरी व्यक्ती शिल्लक असेल, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. त्यासाठी पोलिसांना अहोरात्र सज्ज राहून काम करावे लागेल. कारण देश विघातक शक्ती माओवाद्यात पोहोचलेली आहे. निश्चितपणे गडचिरोली आणि महाराष्ट्र पोलीस सजग राहील. मुख्यमंत्री आणि आम्ही घोषणा केली होती की, हळूहळू पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गडरोलीचा संपर्क जे गाव ३६५ दिवस करू. यातील पहिल्या टप्प्यातील पुलाचे उद्घाटन आज करतो आहे. आज अनेक गावांचा तुटणारा संपर्क दूर होऊन संपर्क पूर्णपणे बारमाही होणार आहे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

औरंगाबादमधील एक धक्कादायक बातमी!, पोलिस पथकाला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न…

IND vs WI T20, आज अंतिम लढाई आणि निर्णायक सामना, पहा दोन्ही संघाची प्लेईंग ११

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version