विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चार दिवस रंगले, उरले फक्त २ दिवस !

राज्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) हे १७ ऑगस्ट पासून चालू झाले आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस रंगणार आहे आणि अवघे २ दिवस हे उरले आहे.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चार दिवस रंगले, उरले फक्त २ दिवस !

राज्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) हे १७ ऑगस्ट पासून चालू झाले आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस रंगणार आहे आणि अवघे २ दिवस हे उरले आहे. विधानसभाचे पावसाळी अधिवेशन हे १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.

आता पर्यंत विधिमंडळ अधिवेशनाचे ४ दिवस झाले आहे आणि अवघे २ दिवस आता उरले आहेत. या दोन दिवसांमध्ये विरोधक आपल्या मागण्यांवरुन आक्रमक होण्याची चिन्हं दिसून येत आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या होत्या. त्यानंतर दि. २२ ऑगस्टचा तिसरा दिवस आणि काल दि. २३ ऑगस्टचा चौथ्या दिवशी अधिवेशनात बरंच काही घडले. आज पाचवा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होणार आहे. या चार दिवसांमध्ये विरोधकांनी अनेक मुद्दे मांडले आहेत आणि कोंडीत पकण्याचा प्रयत्न केला आहे.

अधिवेशनाचा पाहिला दिवस हा १७ ऑगस्ट रोजी रंगला. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाचा मुद्दा मांडला. तसेच देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रोपदी मुर्मू यांची तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची निवड झाल्याबद्द्ल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती.

तर विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून २८९ अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी केली. तसेच हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके ४७ प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळाली आणि शेवटी तो प्रश्न मागे ठेवावा लागला. तर मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ झाला. मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या १२ वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला.

हे ही वाचा :- विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन 

दि २२ ऑगस्ट रोजी म्हणजेच विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, तो आमचा अजेंडा नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तर काल म्हणजेच चौथ्या दिवशी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक वेगळंच रुप महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देत असताना विरोधकांना चांगलेच टोले लगावले आहेत. तर विरोधकांकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. तर ओला दुष्काळ का जाहीर केला नाही म्हणून अजित पवारांनी सभात्याग केला. तर भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. पीडितेसोबत घडलेल्या गुन्ह्याची फडणवीसांनी सभागृहात काल माहिती दिली. या घटनेबाबत बेजबाबदार पोलिसांचे निलंबन केलं असल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

आज दि. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ अधिवेशनाचा पाचवा दिवस रंगणार आहे. आज विरोधक आणि सत्ताधारी पक्ष नवीन कोणते मुरूड काढणार हे पाहणे गरजेचं ठरेल.

हे ही वाचा :-

मुंबईमधील शंभर टक्के रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन

२५ हजार कोटींच्या मागण्या पूर्ण पण, शेतकऱ्यांसाठी दमडी नाही, काँग्रेस आक्रमक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version