विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप याला सुरुवात झाली. नवाब मलिकांवर आरोप करणाऱ्या भाजपला (BJP) आता मलिक कसे चालतात? असा प्रश्न केल्यानंतर सभागृहामध्ये ठिणगी पडली. पण आज हीच ठिणगी वणव्याचे रूप घेण्याची शक्यता आहे. सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुंपण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservation), अवकाळीमुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्वा विषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजापेक्षा एका नेत्यामुळे गाजला तो नेता म्हणजे नवाब मलिक आहे. ऑगस्टमध्ये जमीन मिळाल्यापासून ते कारागृहाच्या बाहेर आहेत. राष्ट्रवादीतल्या उलथापालथीनंतर त्यांची भूमिका काय?हे अजून अस्पष्ट आहे. त्यानंतर ते अचानक हिवाळी अधिवेशनामध्ये सामील झाले. इतकंच नाही तर, ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यात त्यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे हे उघड झाल आहे. हे सगळं असूनसुद्धा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी एक लेटरबॉम्ब टाकला. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले.

जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटामध्ये सहभागी होते आणि त्यानंतर ते आता सत्ताधारी बाकावर बसले आहेत. मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यामुळे भाजपवरही टीका होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून विरोध केला आहे. सत्ता येते जाते पण देश महत्वाचा. मालिकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हण्टले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर आल्याने चर्चा होऊ लागली आहे. विधान भवन परिसरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी मराठा आरक्षणासंदर्भात मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमधून मराठा आरक्षण संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हे ही वाचा:

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

संजय राऊतांचा बळीचा बकरा पक्षश्रेष्ठींनीच केलाय, निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version