‘तारीख पे तारीख’चं सत्र सुरु, २४ तासांत दुसऱ्यांदा तारीख बदलली

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सत्तासंघर्ष हा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Politics) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणारी सुनावणी गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे.

‘तारीख पे तारीख’चं सत्र सुरु, २४ तासांत दुसऱ्यांदा तारीख बदलली

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सत्तासंघर्ष हा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Politics) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणारी सुनावणी गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सुप्रीम कोर्टातील होणारी कालची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर आज यावर सुनावणी पार पडणार होती.

सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा आजसाठी समाविष्ट नाही. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसतेय. क्वचित वेळा सप्लिमेंट्री लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी कामकाजामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे सुनावणी आज होणार नसल्याची वकिलांमध्ये चर्चा आहे. यापूर्वी २२ ऑगस्टला राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पार पडणार होती. त्यानंतर ती पुढे जाऊन आज (२३ ऑगस्ट) रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आजही ही सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा (N. V. Ramana) यांच्या निवृत्तीची तारीख २६ ऑगस्ट आहे. त्यात सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबत असल्यानं खंडपीठ हेच राहणार का? याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा मेन्शनिंग करावं लागेल पण ती विनंती मान्य होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर मुख्यमंत्री एक्नाट्ठ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून (CM Eknath shinde) हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. तर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अरविंद दातार बाजू मांडत आहेत.

यापूर्वी ३ आणि ४ ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई थेट शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरेंची की, शिंदे गटाची या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली होती. यावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नोंदवला. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असे सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तर अपात्र आमदार तसेच खासदारांचा मुद्दा घटनापीठाकडे पाठवण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जाणार का यावर शिंदे – ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत ‘तारीख पे तारीख’चं सत्र सुरु झालं आहे.

२३ ऑगस्ट म्हणजेच, आज मंगळवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होऊ शकते, असं सांगितलं जात होतं. पण आज ही सुनावणी होण्याची शक्यता होईल कि नाही या बाबत शंकाच आहे. आज मंगळवारी निवडणूक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. कारण २३ ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे गटानं आपलं म्हणणं मांडावं, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. जर कोर्टातली कारवाई लांबणार असेल तर त्याआधी आयोगाचा निर्णय येतोय का? हे पाहावं लागेल. मागच्या सुनावणीत कोर्टानं आयोगाला महत्वाचे निर्णय घेऊ नका, असे तोंडी सांगितलं होतं. पण कारवाई थांबवली नव्हती. तसेच लेखी आदेशात निर्णय न घेण्याबद्दलची स्पष्टता नाही. त्यामुळे आयोगाच्या निर्णयावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

 

हे ही वाचा :-

यंदा संजय राऊत यांचा गणेशोत्सव तुरुंगात!

उद्धव ठाकरेंनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती, गुलाबराव पाटीलांचा टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version