Saturday, September 28, 2024

Latest Posts

शेतकरी सेनेच्या शेतकरी संवाद यात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शुभारंभ

शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ आज टेम्भी नाका येथे करण्यात आला.

शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ आज टेम्भी नाका येथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील होते. बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकार सत्तेवर असताना अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. तोच विचार अंगिकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शेतकरी संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या यात्रेचा माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचे जागच्या जागी निराकरण करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्री स्वतः ऑनलाइन त्या शेतकऱ्याशी थेट संवाद साधून त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. आजपासून ही सुरु यात्रा सुरू होणार असून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. यावेळी प्रामुख्याने त्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्याना थेट माहिती देणे, त्याना त्या योजनांचे लाभ मिळवून देणे तसेच तसेच वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून फायद्याची शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद साधून त्याना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार आहे.

या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संवाद साधणे शक्य होणार असून मुख्यमंत्री स्वतः या यात्रेकडे प्राथमिकता देऊन त्याकडे लक्ष देणार आहेत. एकीकडे राज्यात यंदा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आतापासूनच आ वासून उभे आहेत. अशात शासनाचे शेतकरी बांधवांकडे लक्ष असून त्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा संदेश या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा शिवसेनेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज झालेल्या या शुभारंभ प्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा: 

मुंबईकर आज बाप्पाला देणार निरोप , बीएमसीने बनवले २०० कृत्रिम तलाव तर सुरक्षेसाठी १९ हजार पोलीस तैनात

संभाजीनगरने दिला एकतेचा संदेश, गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी तर ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक…

Lalbaugcha Raja Visarjan 2023, १० दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी होणार मार्गस्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss