spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, राऊतांचे भाजप- शिंदे सरकारवर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप- शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.भारतीय जनता पक्षामधील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं, यांना मराठी माणूस, मराठी साम्राज्याविषयी प्रेम नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी जो अपमान केला आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याचा जाब विचारला का नाही, अशी टीका या वेळी संजय राऊत यांनी केली.

पुढे संजय राऊत म्हणाले आज सकाळी नारायण राणे यांना मी उत्तर दिले. तेव्हापासून माझी ओळख सांगणे बंद केलं आहे. त्यांच्यासाठी हे महाशय पवार साहेब असो मागे मोदी आणि अन्य यांच्यावर काहीही बोलतात. परत जर त्यांना असे केले तर मी खपवून घेणार नाही. मी येवढे दिवस त्यांचा मान ठेवायचो आता तसे होणार नाही, असंही त्यांनी या वेळी म्हंटलं. माझ्याशी ओळख काढण्याचा जर परत राणे यांनी प्रयत्न केला तर लक्षात ठेवा माझे नाव सुद्धा संजय राऊत आहे. तुम्ही गुंड आहात तर मी सुद्धा महागुंड आहे. मी पळपुटा नाही. मी गुढगे टेकले नाहीत. मी माझ्या पक्षासाठी जीवाचे रान केले. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्ला बोल केला.

पुढे राऊत म्हणाले, कचऱ्याला आग लागते, मग धूर येतो. हे खासदार परत निवडून येणार नाहीत. हा पाचोळा गोळा करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते निवडून येणार नाहीत. समद्धीचे पैसे, ठेकेदारीचे पैसे यातून पक्ष उभा राहत नाही, पक्ष जो आहे, शिवसेना तो रक्त घाम आणि त्यागातून उभा राहिला आहे. आतापर्यंत मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख केलेला नव्हता. मात्र नारायण राणे यांनी डिवचलं आणि मला सकाळी उत्तर द्यावं लागलं. त्यानंतर त्यांनी मला ओळखणं बंद केला आहे. हे त्या पक्षाचे संस्कार आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा सुद्धा एकेरी उल्लेख केला. पण आम्ही सगळ्यांनी संयम राखला. पण आता यापुढे नाही.

हे ही वाचा:

जेंटलमॅन आहे, याचं सर्टीफिकेट यांच्याकडून घ्यावं लागेल का, आव्हाडांचा बावनकुळेंना सवाल

श्रीकांत आडकरांनी वयाच्या ७८ वर्षी जिंकली पॉवर लिफ्टिंग स्पर्धा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss