spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पहिल्या कार्यालयाचे होणार उद्घाटन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) हे नाव मिळाल्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) शिंदे गटाच्या पक्षाचा पहिलं कार्यालय सुरू करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) हे नाव मिळाल्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) शिंदे गटाच्या पक्षाचा पहिलं कार्यालय सुरू करण्यात आला आहे. या कार्यालयाचे उदघाटन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि. २१ ऑक्टोबर रोजी नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते शिंदे गटाच्या मुंबई बाहेरील पहिल्या कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. हे कार्यालय पाहिलं तर प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि वाघाचे चित्र लावण्यात आलेले आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं आणि शिंदे गटाचं हे पहिलं संपर्क कार्यालय आहे, ज्याची बांधणी नाशिक मध्ये झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. बरोबर वाघाचं इथे चिन्ह देखील आहेत. एकूणच या कार्यालयाचा जर आपण आढावा घेतला तर एक कॉर्पोरेट लूक या ऑफिसला देण्यात आलेला आहेत. इथेच बाजूला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे देखील कार्यालय आहे आणि याच कार्यालयाला लागून हे ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे.

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन पक्षाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर (Mumbai) नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक कार्यालय हे भव्य असं कार्यालय आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या जवळ खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच उभ करण्यात आलेल आहे. विशेष याच रस्त्यावर शालिमार परीसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे.

दरम्यान शिंदे गटाच्या नाशिक कार्यालयात संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख त्याचबरोबर महानगर प्रमुख यांचे कार्यालय आहेत. इथूनच ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कारभार हा चालणार आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे बघणे तेवढेच महत्त्वाचा असून भविष्यामध्ये नाशिक शहरांमध्ये, जिल्ह्यामध्ये आपली फळी निर्माण करण्याचं एक मोठं आव्हान या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.

हे ही वाचा:

‘गौरी भिडेंना पोलीस संरक्षण द्या, अन्यथा त्यांचा पण सुशांत सिंग राजपूत… ‘ नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट4

MCA Election 2022 : एमसीएच्या अध्यक्षपदी कोण? क्रिकेटपटू संदिप पाटील की नागपुरी अमोल काळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss