शिवसेना फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचं आहे- जयंत पाटील

शिवसेना फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचं आहे- जयंत पाटील

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंद झाला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरु आहे. सत्तेविना भाजप राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना (Shivsena) फोडली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. मात्र, कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपनं पक्ष फोडल्याचे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी चांगली साथ दिली. पवारसाहेबांनीचं पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळं या विरोधी काही करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल असा टोला देखील पाटील यांनी भाजपला लगावला.

अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची छोटीशी चाचणी होणार आहे. उमेदवार पळवायचे काम हे करत असतील तर जनता हे पाहत असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची नव्हती, ती भाजपप्रणित होती असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना फोडण्यात भाजपचा हात असल्याचे यातून स्पष्ट होतं असल्याचे पाटील म्हणाले. ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम, दाम, दंड, भेद वापरुन फोडणे योग्य आहे का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार; अमोल मिटकरींनी केला विश्वास व्यक्त

Raj Thackeray : उध्दव-शिंदेना जनता कंटाळलीय, शिवसेनेला सहानुभूती मिळणार नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version