राज्य सरकार योग्य उपाययोजना करताना दिसत नाही- शरद पवार

राज्य सरकार योग्य उपाययोजना करताना दिसत नाही- शरद पवार

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील पुरंदर येथे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पवारांच्या तब्येतीची काळजी करत साहेबांनी बाहेर फिरू नये, असं सांगितलं. यावर शरद पवार यांनी मिश्किल उत्तर देत ‘मी काय म्हातारा झालोय का?’ असं कार्यकर्त्याला विचारलं.

या वर्षीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे व त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे जनजीवन विकलीत झाले आहे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे . त्या पार्श्वभूमीवर शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी म्हटलं की, ‘अतिवृष्टी झाल्यानंतर राज्य सरकारने योग्य उपाययोजना करायला पाहिजे ती उपाययोजना करताना सरकार दिसत नाही. ज्यांच्या हातात केंद्राची सूत्रे आहेत. ते ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जेव्हा माझ्याकडे केंद्राची सूत्र आली तेव्हा शेतकऱ्यांची ७२ हजार कोटींची कर्ज माफी आम्ही केली. जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी उपयुक्त ठरतील म्हणून मी इथे शेतकऱ्यांसोबत संवाद करण्यासाठी आलो आहे.’ आणि सरकारवर निशाणा साधला

पुढे शरद पवारांनी म्हटलं की, पुरंदरमधील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. पुरंदरचे लोक आधी गिरणी कामगार म्हणून जायचे. आता तशी परिस्थिती नाहीय. शेतीचे प्रश्न सुटले नव्हते म्हणून सन्मानाने जगण्यासाठी पुरंदरमधील लोकांनी विविध व्यवसाय केले. आता इथे लोक शेती करू लागले आहेत. व्यवसाय करू लागले आहेत. आधी लोकांना भेटायचं म्हटलं तर रोजगार हमीची काम सुरू करा अशी मागणी व्हायची. आता कारखान्याची मागणी करीत आहेत. म्हणजे चित्र बदलत आहे.अस म्हणत शरद पवारांनी पुरंदरकरांची स्तुती केली.

 

हे ही वाचा :

आरे कॉलनीत बिबट्या चा हल्ला; दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Lakshmi Pooja : लक्ष्मी पूजन करण्यासाठी योग्य मुहूर्त आणि पद्धत, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version