केंद्रासमोर राज्याची भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते त्या पावलावरती पाऊल इथलं सरकार टाकत आहे.

केंद्रासमोर राज्याची भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते त्या पावलावरती पाऊल इथलं सरकार टाकत आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयाच्या मार्फत मुंबई चालवणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महाराष्ट्राच्या करिता बलिदान देणाऱ्या हुतात्मा यांना अभिवादन करत हुतात्मा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. निती आयोगाच्या मार्फत मुंबईचा विकास हातात घेतला तर मुंबई पालिका आणि मुंबईतल्या आमदार खासदारांना काय अर्थ राहनार नाही. म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान कार्यालय मुंबई चालवणार का? असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. मुळात राज्य सरकारसमोर निती आयागाने मुंबईच्या विकासाबाबत जे सादरीकरण केले ते एका खासगी कंपनीने तयार करून दिले होते. मला असे कळले आहे की या खासगी कंपनीने ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या एमएमआरडीएकडूनच मिळवली. म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडूनच माहिती मिळवून ती पुन्हा महाराष्ट्र सरकारपुढेच सादर करण्यात आली. सरकारमधील कोणत्याच नेत्याला हे कसे कळले नाही. तसेच निती आयोग जो काही विकासाचा आराखडा राबवनार त्याची गॅरंटी कोण घेणार? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले की, मुंबईच्या विकास आराखड्याचे काम केंद्राच्या निती आयोगाकडे सोपवणे म्हणजे महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी आम्ही पडेल ती किंमत देऊ. हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आधीच्या काळामध्ये नियोजन आयोग होता. आता त्याच रूपांतर नीती आयोगात करण्यात आलेल आहे. पण हे आयोग फक्त मार्गदर्शनाचं काम करतात केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी पहिली स्टेप ही अशा पद्धतीने केली जाते असे आम्हाला वाटतं कारण अशा पद्धतीने आर्थिक नाड्या अडकवायचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईकर सावध आहे. देशातील सध्या चालू असलेल्या घाणेरड्या राजकारणाला साथ देण्याचा निर्णय जर राज्य सरकार घेणार असेल तर त्यांना वेळीच रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईकर जनतेच्या मागे उभी राहील असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, हळुहळु महाराष्ट्राचे हृदय हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. एक प्रगतीशील, सर्वात वैविध्यपूर्ण, मुंबई हे असे शहर आहे जिथे जात, पात, वर्ग, धर्म याची पर्वा न करता सर्वजण एकत्र राहतात. मात्र, ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत मुंबई महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. महाराष्ट्रापासून ती सुटू देणार नाही. हिमालायसमोर सह्याद्री कधीच झुकली नाही. सह्याद्री हा हिमालयाच्या मदतीला जातो. हे आश्चर्यकारक आहे की मुंबईकरांना नाही तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला जाग आली आहे. हा वेगळा विषारी डाव केंद्रातील सत्ता टाकते आणि महाराष्ट्र सरकार ही केंद्राच्या निर्णयाला नतमस्क होतय. हे आम्हाला चालणार नाही. मुंबई कुठल्यालही परिस्थितीत माझ्यासारख्याचा जीव केला तरी बेहदर. पण आम्हाला हुताम्यांनी दिलेली आमची मुंबई आम्ही सुरकक्षित ठेवू आणि महाराष्ट्र मुंबईला बिलगुन बसला आहे. आमच्या मिठीतून मुंबई आम्ही बाहेर जाऊ देणार नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हडा यांनी केंद्रीय निती आयोग महाराष्ट्राच्या आराखडा तयार करण्याच्या निर्णावर टीका केली. मुंबई ही एका संघ राज्याची राजधानी आहे. हे संघ राज्य आहे, केंद्रीय राज्य नाही. महाराष्ट्राच्या अधिकारावर अतिक्रमण करून तुम्ही निती आयोगाला त्याचावरी बसवणे. हे मुंबई तोडण्याचे काम करत आहात. आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. मुंबई मराठी माणसाचे हृदय आहे. त्याच्या हृदयावर तुम्ही काल हातोडा मारलात. मला आश्चर्य वाटते की, आपले पूर्ण मंत्रिमंडळ तेथे उपस्थितीत होते आणि त्यांच्यासमोर हा निर्णय झाला की मुंबईचा आराखडा निती आयोग तयार करणार. आपला एकही माणूस बोलला नाही. असे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…

बच्चू कडू यांनी केली Sachin Tendulkar कडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version