ठाकरे गटाने लेखी उत्तर केलं दाखल

ठाकरे गटाने लेखी उत्तर केलं दाखल

आज शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह हे कोणाला मिळणार यावर दोन्ही पक्षाची सुनावणी ही निवडणूक आयोगासमोर आणि सुप्रीम कोर्टासमोर सुरु आहे. गेल्या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाकडे दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर ३० तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं दोन्हीही पक्षांना मुदत दिली होती. तर आता उद्धव ठाकरे गटाने आपलं लेखी उत्तर हे निवडणूक आयोगामध्ये दाखल केलं आहे.

या याचिकेत शिवसेना पक्षातील बंडखोरी तारखेसह उत्तरात मंडळी आहे. तर एकनाथ शिंदेंनी कशा प्रकारे बंड केलं हे मेलद्वारे उत्तरात मांडले आहे. शिंदेंचं पद घटनात्मक नसल्याचा ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. शिवसेनेची घटना आधी मेनी होती, पण नंतर ४० आमदारांना घटना नकोशी का वाटली ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला आहे. तर निवड आयोगाने आम्हाला न्याय द्यावा असं सुद्धा लेखी उत्तरात सांगितलं होत.

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटांकडून लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोगाकडून पुढील कार्यवाही केली जाईल असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.मुख्य म्हणजे जरी सुनावणी पूर्ण झाली तरीही निवडणूक आयोग हे निकाल राखून ठेवून नंतर जाहीर करु शकतं. म्हणूनच अंतिम निकालाचा मुहूर्त कुठला असेल याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

‘Dhishkyaoon’ चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस

‘वाळवी’ची हिंदी चित्रपटावर मात, तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version