spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाला शिंदे गटाकडून पुन्हा मोठा धक्का; धाराशिवचा हा नेता करणार शिंदे गटात प्रवेश

लवकरच विधानसभा निवडणुका राज्यात पार पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचबरोबर आता सर्व पक्षांसोबतच इच्छूक उमेदवारांनाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी मराठवाड्यात उमेदवारीसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या जाऊ लागल्या आहेत. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूका तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न असा दुहेरी पट मोठा चर्चेचा विषय झाला असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कित्येक नेत्यांची उमेदवारी मिळण्यावरून निराशा होत असल्याकारणामुळे ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशासाठी शेकडो वाहनांचा ताफा घेऊन परंडा शहराकडे कापसे आणि त्यांचे कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

ठाकरे गटाला मोठा धक्का:
शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर अनेक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आता निवडणुकांच्या तोंडावर धाराशिवमधील कळंबचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांचा शिंदेंच्या शिवसेना गटात सहभाग होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांसाठीही शिवाजी कापसे इच्छुक होते मात्र त्यावेळी सुध्दा पक्षाने शिवाजी कापसेंना निराशाच मिळाली होती. पक्षाने कैलास पाटील यांना उमेदवारी देऊ केली होती. यावेळी सुध्दा विद्यमान आमदार कैलास पाटील यांनाच तिकीट मिळण्याची दाट शक्यता जाणवत असल्यामुळे कापसे यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.

शिवाजी कापसे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. आज त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजना कार्यक्रमात उपस्थित परंडा येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवाजी कापसे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. शिवाजी कापसे हे कळंब-धाराशिव विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे कळतं आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना विधानसभेचं तिकीट मिळणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

हे ही वाचा:

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास तातडीने पाऊले उचलण्याचे CM Eknath Shinde यांचे निर्देश

अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss