Thursday, July 4, 2024

Latest Posts

“तिजोरीत खळखळाट, अन् थापांचा सुळसुळाट” असे म्हणत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस दणाणून सोडला

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ तिसरा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ तिसरा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात अनेक घोषणा देण्यात आल्या. विरोधकांनी अर्थासंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तर आज तिसऱ्या दिवशी कामकाज सुरु होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले.

सुरुवातीला सत्ताधारी पक्षांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. किस्सा कुर्सी का? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर व्यंगचित्रातून टीका करण्यात आली. एक आघाडी बारा भानगडी, गांव बसा नही लुटेरे आ गए, अशा जोरदार घोषणा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे नेते (Bhaskar Jadhav) आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale)  यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.

यानंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना भरत गोगावले खरपूस समाचार घेतला. “महायुतीत बारा भानगडी आहेत. हे गोगावले पायऱ्यांवर उभे राहून सांगत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सीएम पदी योग्य होते. हे सांगण्याचा प्रयत्न गोगावले करत आहेत,” अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने हे प्रकरण नक्की काय आहे.?

विधान सभेच्या विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलनाला सुरूवात केली. चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. यावेळी विरोधकांच्या हातात विविध पोस्टर दिसून आले ज्यावर अनेक लिहिल्या गेल्या.  तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट. प्रत्यक्षात निधींची वानवा, वरून खैरातीचा गारवा. खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हातात विठ्ठल रुखुमाईची मूर्ती होती.

विरोधकांकडून आज विधानसभेत नागपूर-अमरावती महामार्गावरील चामुंडी ब्लास्टचा मुद्दा मांडला जाणार आहे. चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लक्षवेधीत मांडणार आहेत. या ठिकाणी सातत्याने स्फोट होत असतानाही सरकारने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे विधानपरिषदेत सतेज पाटील आणि काँग्रेस नेत्यांकडून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा मांडला जाणार आहे. त्यामुळे आज विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेऱ्यात घेण्याची हि तयारी असल्याचे दिसून येते आहे.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss